Vishwas Patil : 'संभाजी' कादंबरीतील 'तो' उल्लेख काल्पनिक! विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले?

07 Mar 2026 15:05:22

vishwas patil

मुंबई (Vishwas Patil) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील यांनी दिली आहे. शुक्रवार दि. ६ मार्च रोजी पार पडलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर अॅड हिरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कादंबरीतील उल्लेख काल्पनिक असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील, पाटलीण असे उल्लेख सुद्धा काल्पनिक असल्याची माहिती दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'संभाजी' या कादंबरीमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार विशिष्ट समाजातील व्यक्तीने केल्याची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या दंगलीच्या संदर्भात कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अॅड. शिशिर हिरे पानी उलटतपासणी घेताना पाटील यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तात उल्‌लेख नाही. 'संभाजी' या कादंबरीमधील जना पुरटीण, गोविंद नाक, दामाजी पाटील, पाटलीण हे उल्लेख पूर्णपणे काल्‌प‌निक आहेत, असे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. संभाजी ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्य यावर आधारित कलपना विलास आहे,' असे पाटील यांनी सांगितल्‌याची माहिती अॅड हिरे यांनी दिली. 


Powered By Sangraha 9.0