मुंबई : (Sunetra Pawar) खरेतर राज्यसभा हे उच्च सभागृह आहे. अतिशय अनुभवी लोकांचे सभागृह आहे. तिथे जाताना आपण सगळ्याच गोष्टी जाणकार म्हणून शिकून घेणे आधी महत्त्वाचे आहे आणि तिथून पुढे पार्थ नक्कीच चांगली कामगिरी करेल असे मला वाटते, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा (Sunetra Pawar) पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदान होणार असून यापैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
हेही वाचा : राज्यसभेसाठी पवारांनी डाव साधला? काय घडलं?
अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवर रोहित पवार यांच्यासह अनेकांकडून सातत्याने आक्षेप घेण्यात येत आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या की, “अजितदादांच्या अपघाताची अनेक वेगवेगळ्या एजन्सीमार्फत चौकशी सुरू आहे. आता प्राथमिक अहवाल आला आहे. तो संपूर्ण अहवाल नाही, त्यामुळे सगळा अहवाल आल्यानंतर आपण यावर बोलू शकतो.”(Sunetra Pawar)