
ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद वृक्षवर्धन २०२६ मुंबईतील हॉटेल सहारा येथे सुरू झाली. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (एटीसीए) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत ते बोलत होते. यावेळी एटीसीए संघटनेचे संचालक वैभव राजे, संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, "मुंबई, दिल्लीसह जगभरातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या भासत आहे. सर्वत्र निसर्ग आणि माणूस यामधील द्वंद्व सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अर्बोरिकल्चर परिषदेच्या निमित्ताने या सर्व समस्यांवर पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपाय काढण्याचे पाहून मला समाधान वाटत आहे. पारंपरिक वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अपेक्षित परिणाम मिळाले नाही हे वास्तव आहे," असे ते म्हणाले.(Ashish Shelar)
"आपला देश, राज्य आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये वृक्षाचा समावेश आहे. माणसांप्रमाणे झाडावर देखील उपचार होऊ शकतात, म्हणून झाडांचे क्लिनिक मला या परिषदेमध्ये पाहायला मिळाले. भविष्यातील पर्यावरण संरक्षणासाठी कल्चरचा धोरणात समावेश करून त्यासाठी आवश्यक तो खर्च देखील केला जाईल. शास्त्रीय पद्धतीने वृक्षांचे संवर्धन आणि 'एक पेड मा के नाम' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घराघरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे," असेही त्यांनी (Ashish Shelar) सांगितले.
दि. ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छा दूत आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा मुख्य वक्त्या असतील. जागतिक तज्ञांच्या सत्रांसह शहरी वृक्षसंवर्धन, अरबोरिकल्चर पद्धती आणि हवामान बदल या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.(Ashish Shelar)