Mumbai BKC Financial Growth : बीकेसीच भारतातील अग्रगण्य वित्तीय आणि व्यापारी केंद्र

07 Mar 2026 17:54:20
Mumbai BKC Financial Growth
 
मुंबई : (Mumbai BKC Financial Growth) वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील व्यावसायिक जागेची वाढती मागणी लक्षात घेता देशातील अग्रगण्य शेअर बाजार संस्था बॉम्बे स्टॉक एक्सस्चेंज (बीएसई)ने मुंबईतील विस्तारासाठी बीकेसीमध्ये भूखंड उपलब्धतेबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडे अधिकृत विचारणा केली आहे.(Mumbai BKC Financial Growth)
 
बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेऊन संभाव्य विस्ताराच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली. ही घडामोड नॅशनल स्टॉक एक्सस्चेंज ऑफ इंडिया (एनएसई)ने बीकेसी परिसरात अलीकडेच केलेल्या विस्तारानंतर समोर आली आहे. त्यामुळे बीकेसीचे भारतातील अग्रगण्य वित्तीय आणि व्यापारी केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Mumbai BKC Financial Growth)
 
हेही वाचा : Pakistan Petrol Diesel Price Hike : पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल ५५ रुपयांनी महाग; पेट्रोल ३३६ तर डिझेल ३२१ रुपये प्रति लिटर
 
गेल्या काही वर्षांत आघाडीच्या वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक गुंतवणूक संस्थांनी बीकेसीला प्राधान्य दिले आहे. मोक्याचे भौगोलिक स्थान, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सक्षम आर्थिक परिसंस्था यामुळे बीकेसीने देशाच्या वित्तीय नकाशावर आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. एमएमआरडीए मुंबईत जागतिक दर्जाच्या वाणिज्य पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देत आहे.(Mumbai BKC Financial Growth)
 
बीएसईच्या मागणीच्या अनुषंगाने योग्य भूखंड शोधून त्याच्या वाटप प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी एमएमआरडीए सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण भूमिकेत आहे. बीकेसीतील ही विस्ताराची चळवळ केवळ संस्थांच्या वाढीपुरती मर्यादित नसून, मुंबईच्या जागतिक वित्तीय केंद्र म्हणून उभारणीच्या दिशेने टाकलेले आणखी एक भक्कम पाऊल ठरत आहे.(Mumbai BKC Financial Growth)
  
Powered By Sangraha 9.0