Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय?

06 Mar 2026 13:19:58



Maharashtra Budget 2026 
मुंबई : (Maharashtra Budget 2026) महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज, ६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे खाते स्वतः सांभाळून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. (Maharashtra Budget 2026)
 

अर्थसंकल्पापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन...
 
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्याची परंपरा पाळली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्याची ही परंपरा आहे. या वेळी मंत्री, आमदार आणि अधिकारी एकत्र उपस्थित राहतात. (Maharashtra Budget 2026)
 

२३ फेब्रुवारीपासून सुरू अधिवेशन...
 
महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ दरम्यान चालणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर ९ आणि १० मार्च रोजी चर्चा होणार आहे. दरम्यान, होळी आणि गुढीपाडवा या सणांच्या सुट्ट्यांमुळे जवळपास ११ दिवस कामकाज बंद राहणार आहे. (Maharashtra Budget 2026)
 
अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रांवर भर?
 
यंदाच्या अर्थसंकल्पात विकास आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांच्या विकासासाठी मोठ्या भांडवली खर्चाची घोषणा होऊ शकते. (Maharashtra Budget 2026)
 
तसेच खालील क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या तरतुदी अपेक्षित आहेत:
 
शेतकऱ्यांसाठी अनुदान व कृषी योजनांचा विस्तार
 
महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना 
 
ग्रामीण विकासासाठी निधी वाढ 
 
पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन
 
मुंबई– अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित पायाभूत सुविधा
 
एमएसएमई आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना
 
फडणवीसांचा अर्थसंकल्पाचा अनुभव
 
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी २०२३-२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून सादर केला होता. त्या अर्थसंकल्पात जलसंधारण, शेतकरी मदत आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या होत्या. (Maharashtra Budget 2026)
 
तसेच २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी अर्थ विभागाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यामुळे विकासकेंद्रित आर्थिक धोरणे राबवण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. (Maharashtra Budget 2026)
 
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महागाई, रोजगार, पायाभूत सुविधा आणि सामाजिक योजनांवर काय निर्णय घेतले जातील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शेतकरी, उद्योग, महिला आणि शहरी विकासासाठी मोठ्या घोषणांची शक्यता असल्याने हा अर्थसंकल्प राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. (Maharashtra Budget 2026)
 

 
Powered By Sangraha 9.0