Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा!’ अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

06 Mar 2026 17:42:00
 
Ladki Bahin Yojana
मुंबई : (Ladki Bahin Yojana) महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेली ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून तिच्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Ladki Bahin Yojana)
 
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे या योजनेत कोणतीही अडचण येणार नाही. ८ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छाही दिल्या. (Ladki Bahin Yojana)
 
हेही वाचा: Maharashtra Budget 2026: ११०२ कोटींचे उड्डाणपूल, ‘मुंबईची ट्रॅफिक समस्या सुटणार का?’
 
योजनेबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
 
मुख्यमंत्री म्हणाले,“काळजी करू नका, तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय. ही योजना सुरूच राहणार आहे.” (Ladki Bahin Yojana)
 
त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे महिलांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा लाभ पुढेही कायम राहणार आहे. (Ladki Bahin Yojana)
 
मागील वर्षी या योजनेसाठी सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात या निधीत आणखी वाढ करण्यात आली असून महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)
 
महिला सक्षमीकरणासाठी आणखी उपक्रम...
 
अर्थसंकल्पात महिलांसाठी 'लखपती दीदी' सारख्या उपक्रमांनाही चालना देण्यात येणार आहे. यामध्ये, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, एकल महिलांसाठी विशेष कल्याणकारी धोरण अशा विविध उपाययोजनांचा समावेश असणार आहे. (Ladki Bahin Yojana)
 
 
Powered By Sangraha 9.0