US-Israel-Iran War : भारताला मोठा दिलासा! रशियन तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून ३० दिवसांची तात्पुरती सुट

06 Mar 2026 17:02:04

US-Israel-Iran War

नवी दिल्ली : (US-Israel-Iran War) इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं भारतासाठी तात्पुरती सवलत जाहीर केली आहे. या निर्णयानुसार भारतीय रिफायनरींना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ३० विशेष परवाना दिला आहे. म्हणजेच तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.हा परवाना ३ एप्रिलपर्यंत वैध राहील. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या टँकर्सचा मार्ग मोकळा होणार आहे.(US-Israel-Iran War)

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे तेल आणि गॅस उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणाअंतर्गत हे तात्पुरते पाऊल उचलण्यात आले आहे."(US-Israel-Iran War)

पुढे ते म्हणाले, "भारत अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे आणि भविष्यात भारत अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवेल, अशी अपेक्षा आहे. इराणमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर निर्माण झालेला दबाव कमी करण्यासाठी आणि तेलाचा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे." भारताच्या सरकारी तेल कंपन्या आता रशियाकडून २ कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशाला मोठा दिलासा मिळणार आहे.(US-Israel-Iran War)

Powered By Sangraha 9.0