मुंबई : (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्याचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यात ४० हजार ५५२ कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित करण्यात आली आहे. तर, राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.(CM Devendra Fadnavis)
देशाच्या एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. वस्तू व सेवा कर दरांच्या पुनर्रचनेमुळे उत्पादन आणि उपभोग या दोन्ही क्षेत्रांत सकारात्मक वाढ दिसून येते. सन २०२५-२६ मध्ये महसुली जमेचा सुधारित अंदाज ६ लाख १ हजार ४८९ कोटी रुपये निश्चित करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
एकूण खर्चात वाढ
राज्याच्या एकूण खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सन २०२५-२६ चा एकूण खर्च ७ लाख ५५ हजार ९२० कोटी रुपये असून भांडवली आणि कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा : Maharashtra Budget 2026: महायुती सरकारने शब्द पाळला; राज्यातील शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
खर्च आणि तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेसाठी २१ हजार ८६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १ हजार ७०२ कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर, कार्यक्रम खर्चासाठी २ लाख ७५ हजार ६२६ कोटी रुपये देण्यात आले आहे. अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी २३ हजार १५० कोटी रुपये तर, आदिवासी घटक कार्यक्रमकरिता २१ हजार ७२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "राजकोषीय तूट वाढलेली दिसत असली, तरी ती स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात शासन यशस्वी झाले आहे. तसेच महसुली तूट सातत्याने १ टक्क्याच्या खाली राखल्याने राजकोषीय उत्तरदायित्व आणि वित्तीय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झालेले नाही," असे त्यांनी (CM Devendra Fadnavis) स्पष्ट केले.