मुंबई : (West Bengal Governor CV Ananda Bose resigns) पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. राज्यपालांचे ओएसडी यांनी याबाबतची अधिकृत माहिती देत राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आल्याची माहिती दिली.(West Bengal Governor CV Ananda Bose resigns)
राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तथापि, त्यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. आनंद बोस यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती आणि त्या काळात त्यांनी राज्यातील विविध प्रशासकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती.(West Bengal Governor CV Ananda Bose resigns)
दरम्यान, राष्ट्रपतींकडून त्यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(West Bengal Governor CV Ananda Bose resigns)