मुंबई : (US-Iran Tensions) अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकन नौदल भारतीय बंदरांचा वापर करत असल्याचा दावा अमेरिकन वृत्तवाहिनी वन अमेरिका न्यूज नेटवर्क (One America News Network - OAN) यांनी केला होता. मात्र, भारत सरकारने या दाव्यांचे ठाम खंडन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट-चेक हँडलने संबंधित बातम्या पूर्णपणे निराधार आणि बनावट असल्याचे स्पष्ट केले.(US-Iran Tensions)
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका भारतीय बंदरांचा वापर करत असल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. अमेरिकन लष्करातील माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी वन अमेरिका न्यूज नेटवर्क या चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धात भारतीय नौदलाच्या तळांचा वापर करत असल्याचे सूचित करणारे विधान केले होते. यावर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.(US-Iran Tensions)
या मुलाखतीत "आपले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. आपले हार्बर इन्स्टॉलेशन उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्याला खरंतर भारत आणि भारतीय बंदरांचा आधार घ्यावा लागत आहे, जे फार काही चांगले नाही. हेच नौदलाकडून सांगण्यात येत आहे," असे डग्लस म्हणत असल्याचे ऐकायला येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या फॅक्ट चेक अकाउंटने ओएएन वर करण्यात आलेला हा दावा 'खोटा आणि चूक' असल्याचे म्हटले आहे.अमेरिकन नौदल भारतीय बंदरांचा वापर करत असल्याच्या वृत्तांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे. नागरिकांनी अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध राहावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.(US-Iran Tensions)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\