मुंबई : (Iran Israel War 2026) मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गल्फ ऑफ ओमानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ मालवाहू ऑईल टँकर ‘एमकेडी व्योम’वर १ मार्चच्या दरम्यान ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यात मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय दीक्षित अमृतलाल सोलंकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Iran Israel War 2026)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित हे जहाजावर ऑयलर म्हणून कार्यरत होते. हल्ल्यानंतर काही वेळ ते बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते; मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Iran Israel War 2026)
दीक्षित सोलंकी यांचे मूळ गाव गुजरातमध्ये आहे; मात्र रोजगाराच्या निमित्ताने ते मुंबईच्या कांदिवली भागात कुटुंबासह राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी ते गावी गेले होते आणि त्यानंतर पुन्हा जहाजावर रुजू झाले. दुर्दैवाने, कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. (Iran Israel War 2026)
इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीत काही जहाजांवर हल्ले होत असल्याचे समोर येत असून, त्यात भारतीय नागरिकांनाही जीव गमवावा लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. संबंधित भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (Iran Israel War 2026)