Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok : अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात दिग्गजांची मांदियाळी; बच्चन, गावस्कर, द्रविडसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित!

05 Mar 2026 21:28:54
Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok
 
मुंबई : (Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok) क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेले सचिन तेंडुलकर यांचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर याने आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक नुकतेच विवाहबंधनात अडकले असून त्यांनी आपल्या एकत्र आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. हा लग्नसोहळा अत्यंत भव्य पद्धतीने पार पडला असून अनेक नामवंत सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. ऑगस्टमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता आणि आता त्यांच्या लग्नाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. माजी फलंदाज सुनील गावस्कर हे त्यांच्या पत्नी मार्शनील गावस्करसह उपस्थित होते. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
त्याचबरोबर, विश्वचषक विजेता अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग त्याची पत्नीहेझल कीचसह या कार्यक्रमाला आला होता. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण हेदेखील या समारंभात उपस्थित होते. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, माजी फलंदाज सुरेश रैना व त्याची पत्नी प्रियंका चौधरीसह उपस्थित होता. तसेच समालोचक आकाश चोप्रा व त्याची पत्नी आक्षी माथूरसह हेदेखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान त्याची पत्नी सागरिका घाटगेसह लग्नाला उपस्थित होता, तर माजी गोलंदाज हरभजन सिंग त्याची पत्नी गीता बसरासह आला होता. भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल व त्याची पत्नी अवनी झवेरीसह उपस्थित होता, तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीदेखील या सोहळ्याला हजर होता.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
उपस्थित असलेल्या इतर क्रिकेटपटूंमध्ये भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि त्यांची पत्नी मनाली वेंगसरकर, कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाळ, तसेच भारताचा माजी गोलंदाज प्रज्ञान ओझा यांचा समावेश होता.
 
या कार्यक्रमाला क्रिकेट प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शहा आणि भारताचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे समारंभाला उपस्थित होते. तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेदेखील कार्यक्रमस्थळी होते. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनीही या समारंभात हजेरी लावली.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
अन्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती...
 
क्रिकेट विश्वातील पाहुण्यांसह सिनेविश्वातील अनेक मान्यवरांनीही या लग्नसमारंभात सहभाग घेतला. अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनी कुटुंबातील सदस्यांसह कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपट निर्माते आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर त्यांच्या पत्नी सुनीता गोवारीकर यांच्यासह उपस्थित होते. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील अथितींनीही विशेष हजेरी लावली. ज्यात महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलारदेखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. तर गानसम्राज्ञी आशा भोसले यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
 
हेही वाचा : 'सालबर्डी'तून दिसणार पूजा सावंतचा वर्दीतला जबरदस्त अंदाज
 
कार्यक्रमाचं विशेष आकर्षण...
 
या भव्य विवाहसोहळ्यात संगीताचाही खास रंग पहायला मिळाला. सुप्रसिद्ध गायिका 'हर्षदीप कौर' आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार 'शंकर महादेवन' यांच्या उपस्थितीने समारंभाची शोभा अधिकच वाढली. वधूच्या आगमनाच्या वेळी हर्षदीप कौर यांच्या मधुर आवाजाने वातावरण भारावून गेले, तर शंकर महादेवन यांनी मंगलाष्टक सादर करत विवाहसोहळ्याला पारंपरिक आणि भावपूर्ण स्पर्श दिला.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
पण सानिया चंडोक आहे कोण ?
 
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक कोण आहे याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. सानिया सुप्रसिद्ध घई कुटुंबातून येते. गेल्या काही दशकांपासून या कुटुंबाने मुंबईच्या आतिथ्य आणि अन्न उद्योगात मजबूत पकड निर्माण केली आहे.
कुटुंबाच्या व्यवसायाची मुळे इक्बाल कृष्णन “आयके” घई यांच्यापासून सुरू होतात. त्यांनी आयकॉनिक क्वालिटी आईस्क्रीम ब्रँड आणि मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा वारसा पुढे रवी इक्बाल घई यांच्या नेतृत्वाखालील ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडद्वारे पुढे चालू आहे, जे बास्किन-रॉबिन्स इंडियामागील प्रमुख कंपनी म्हणून ओळखले जाते.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
सानिया स्वतःही व्यवसाय क्षेत्रात सक्रिय आहे. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून पदवीधर असलेली ती पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून काम करते. याशिवाय ती मुंबईमध्ये “मिस्टर पॉज” नावाचा लक्झरी पाळीव प्राणी स्पा चालवते, जो पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी विशेष सेवा देण्यासाठी ओळखला जातो.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
एकूणच, क्रिकेट, सिनेमा आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा अत्यंत भव्य आणि संस्मरणीय ठरला. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींनी नवदांपत्याला शुभेच्छा देत या सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली.(Arjun Tendulkar Marries Saaniya Chandhok)
 
Powered By Sangraha 9.0