Rajya Sabha Election 2026: १६ मार्चला ३७ राज्यसभा जागांसाठी मतदान; महाराष्ट्रात शरद पवारांवरून राजकीय सस्पेन्स?

04 Mar 2026 13:08:39
 
Rajya Sabha Election 2026
 
मुंबई: (Rajya Sabha Election 2026) निवडणूक आयोगाने १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ५ मार्च आहे. या ३७ जागांपैकी १२ जागा एनडीएकडे, तर २५ जागा विरोधकांकडे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागा, त्यानंतर तामिळनाडू ६ आणि पश्चिम बंगाल व बिहार प्रत्येकी ५ जागा आहेत. (Rajya Sabha Election 2026)
 
महाराष्ट्रात मात्र आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्याने अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पवारांना उमेदवारी दिल्यास आघाडीत नाराजी वाढू शकते, तर न दिल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात. (Rajya Sabha Election 2026)
 
हेही वाचा: Rajya Sabha Election 2026: भाजपकडून राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलणार? 
 
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य (Rajya Sabha Election 2026)
 
शरद पवार (श.प. गट)
 
रामदास आठवले (रिपाई)
 
फौजिया खान (श.प. गट)
 
रजनी पाटील (काँग्रेस)
 
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
 
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
 
भागवत कराड (भाजप)
 
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
 
५ मार्च – अर्जाची अंतिम मुदत
 
६ मार्च – छाननी
 
९ मार्च – अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
 
१६ मार्च – सकाळी ९ ते सायं. ४ मतदान; सायं. ५ नंतर मतमोजणी
 
 
Powered By Sangraha 9.0