मुंबई : (Rajya Sabha 2026) राज्यसभा निवडणूकीसाठी अखेर महाविकास आघाडीचे एकमत झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या एका जागेसाठी मविआमध्ये चुरस सुरु होती. (Rajya Sabha 2026)
महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा आल्याने तिन्ही पक्षांनी यावर दावा सांगितला होता. मात्र, शरद पवार गटाच्या नेत्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेत शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही वारंवार संपर्क साधला. (Rajya Sabha 2026)
हेही वाचा: Rajya Sabha Election 2026: १६ मार्चला ३७ राज्यसभा जागांसाठी मतदान; महाराष्ट्रात शरद पवारांवरून राजकीय सस्पेन्स?
दरम्यान, बुधवारी शरद पवार गटाच्या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आ. विजय वडेट्टीवार आणि आ. सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Rajya Sabha 2026)
याबाबत घोषणा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "शरद पवार हे केवळ महाविकास आघाडी नव्हे तर इंडिया आघाडीचे मोठे नेते आहेत. याअनुषंगाने त्यांच्या उमेदवारीबाबत आमची सर्वांशी चर्चा झाली. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशीही चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आम्ही त्यांना मतदान करणार आहोत.” (Rajya Sabha 2026)
पार्थ पवार अर्ज दाखल करणार
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हेसुद्धा गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Rajya Sabha 2026)