दुबईतील उड्डाणे ठप्प; भारतीयांसह शेकडो प्रवाशांना दिलासा देत डॉ. धीरज जैन यांचा मानवतेचा हात

04 Mar 2026 18:30:25

डॉ. धीरज जैन
 
मुंबई : दुबई आणि आखाती देशांतील विविध विमानतळांवर अचानक उड्डाणे थांबल्याने निर्माण झालेल्या गोंधळामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. हॉटेल्समध्ये वाढलेल्या गर्दीमुळे निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, दुबईस्थित उद्योगपती डॉ. धीरज जैन यांनी पुढे येत मानवतेचा एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

1XL Infra चे अध्यक्ष आणि जैनम जिविका फाउंडेशनचे संस्थापक असलेल्या डॉ. जैन यांनी आपले खाजगी फार्महाऊस गरजूंसाठी खुले करून हजारो लोकांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या फार्महाऊसमध्ये मोठा हॉल, टेंट्स, मजलिस क्षेत्र अशी प्रशस्त व्यवस्था असून अडकलेल्या प्रवाशांसाठी मोफत जेवण, गाद्या, उश्या, ब्लँकेट्स यांच्यासह विमानतळावरून आणण्याची आणि परत सोडण्याची सुविधाही दिली जात आहे.

“कोणीही उपाशी राहू नये आणि कोणालाही जमिनीवर झोपावे लागू नये,” असे डॉ. जैन सांगतात. अनेक प्रवासी स्वतः टॅक्सीने येतात, तर काहींना त्यांच्या टीमकडून थेट विमानतळावरून आणले जाते.हा उपक्रम केवळ निवारा देण्यापुरताच मर्यादित नाही, तर भीती, अनिश्चितता आणि तणावाच्या वातावरणात सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारा आहे. विशेष म्हणजे ही मदत केवळ भारतीयांसाठी नसून राष्ट्रीयत्वाची कोणतीही अट नाही. प्रत्येक गरजू व्यक्तीला समान मदत दिली जात आहे.
जर तुमचे नातेवाईक किंवा ओळखीचे दुबईत अडकले असतील आणि मदतीची गरज असेल, तर खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधू शकता:
 
📞 WhatsApp / कॉल: +971 54 577 1234
📞 Jainam Jivika Foundation हेल्पलाइन: +91 95 5289 5289
📧 ईमेल: info@JJFIndia.com


Powered By Sangraha 9.0