Pankaj Bhoyar : सातारा जिल्ह्यातील पुसेगाव हद्दीतील अवैध व्यवसायावर कारवाई - राज्यमंत्री पंकज भोयर

04 Mar 2026 18:07:09
Pankaj Bhoyar
 
मुंबई : (Pankaj Bhoyar) सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दारू, जुगार, मटका व ऑनलाईन चक्री खेळ यांसारख्या अवैध व्यवसायांवर सातत्याने छापे टाकून कारवाई करण्यात येत असल्याचे माहिती राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.
 
हेही वाचा : संजय राऊत यांची कल्पकशक्ती सुमार; भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला
 
राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) म्हणाले, "या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करण्यात आली असून अवैध व्यवसायांची वसुली वेटरमार्फत होत असल्याचा कोणताही प्रकार निदर्शनास आलेला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, संबंधित सदस्यांनी पेन ड्राइव्हद्वारे काही माहिती उपलब्ध असल्यास ती प्रशासनाला द्यावी. त्यानुसार दोषी आढळल्यास निश्चितच तपास करून कारवाई करण्यात येईल."(Pankaj Bhoyar)
 
Powered By Sangraha 9.0