8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी-निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी; वैद्यकीय भत्ता १ हजारावरून थेट २० हजार रुपयांपर्यंत वाढणार?

04 Mar 2026 17:08:08
8th Pay Commission

नवी दिल्ली : (8th Pay Commission) केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आला असून कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांचे 'युनिफाइड चार्टर' तयार केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नॉन-सीजीएचएस क्षेत्रांमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता दरमहा १,००० रुपयांवरून थेट २०,००० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. (8th Pay Commission)

वाढत्या उपचारांच्या खर्चाचा विचार करता, जिथे सीजीएचएस सुविधा नाही अशा भागातील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यासोबतच ३.२५ फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून ७ टक्के करणे आणि किमान वेतन निश्चितीसाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या ३ ऐवजी ५ गृहीत धरण्याची मागणी लावून धरली आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यासह ५० टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याबाबत कर्मचारी आक्रमक आहेत. (8th Pay Commission)

कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, विशेषतः गावांमध्ये किंवा दुर्गम भागात जिथे सरकारी रुग्णालये किंवा सीजीएचएस सुविधा नाहीत तिथे आता १,००० रुपयांत उपचार परवडणे कठीण झाले आहे. आरोग्यसेवेच्या महागाईमुळे ही मागणी जोर धरत आहे. सरकारने किंवा आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. जर तो मंजूर झाला तर लाखो लोकांचे जीवन सोपे होईल. कर्मचारी संघटना यासाठी सातत्याने आग्रह धरत आहेत. ही मागणी आरोग्यसेवा सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. (8th Pay Commission)


Powered By Sangraha 9.0