कुवेतमध्ये अडकला मुलगा; अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं मदतीसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना आवाहन

    03-Mar-2026   
Total Views |

Vishakha Subhedar

मुंबई : (Vishakha Subhedar son stranded in Kuwait)
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये त्यांचा मुलगा अडकला आहे. त्यामुळे दुबईतून नागरिकांना ज्या पद्धतीने परत आणले, तसेच कुवेतमधील भारतीयांनाही सुखरुप परत आणण्यासाठी मदत करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.(Vishakha Subhedar son stranded in Kuwait)
 
हेही वाचा - Israel US Iran war : सुटकेचा निःश्वास! विशेष विमानाने दुबईमध्ये अडकलेल्या १४९ भारतीयांची घरवापसी! 
काय म्हणाल्या विशाखा सुभेदार?

विशाखा सुभेदार यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, माझा मुलगा अभिनय लंडनच्या प्रवासाला निघाला होता. पण सध्या तो कुवैतमध्ये अडकला आहे. गेली ४ दिवस एअरस्पेस नसल्यामुळे तो तिथे अडकून निघाला आहे. आता तेथील परिस्थिती गंभीर होत आहे. आपण हे बातम्यांमध्ये पाहत आहोत. तो स्वतः तिथे ते अनुभवत आहे. तिथे ड्रोन हल्लेही होत आहेत. आत्ता विमान कंपनीने त्याची तेथील एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे."(Vishakha Subhedar son stranded in Kuwait)

"कुवैतमधील भारतीय दुतावासानेही त्याला मदत केली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसे दुबईतील लोकांना परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली, तशी व्यवस्था कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांनाही परत आणण्याची व्यवस्था करावी ही त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे मायदेशी वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची व्यवस्था करावी. त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, एवढीच विनंती मी सरकारला आणि भारताच्या पंतप्रधानांना यांना करत आहे. त्यांनी या लवकरात लवकर या स्थितीतून एखादा मार्ग काढावा," असे विशाखा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.(Vishakha Subhedar son stranded in Kuwait)



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\