Rajnath Singh : राजनाथ सिंह यांचा इराण-इस्रायल वादावरचा व्हिडिओ बनावट! PIB Fact Checkचा खुलासा
Total Views |
नवी दिल्ली : (Rajnath Singh) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचं समर्थन केल्याचा दावा करणारा समाजमाध्यमांवर फिरणारा व्हिडिओ बनावट असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) विभागाने या दाव्याचे खंडन करत, संबंधित व्हिडिओ डिजिटली छेडछाड करून तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. संरक्षण मंत्र्यांनी अशाप्रकारचं कोणतंही विधान केलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने नागरिकांना अशा दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या व्हिडिओपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
https://www.mahamtb.com/authors/Anisha_Dumbre.html
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\