पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६ उत्साहात संपन्न

    03-Mar-2026
Total Views |

मुंबई: दादर येथील भाजपा मुंबई कार्यालयात सोमवार दि.२ रोजी मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६” उत्साहात पार पडले.

यावर भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली की,"पक्षाची विचारधारा प्रभावीपणे मांडणे, जनतेशी थेट व परिणामकारक संवाद साधणे आणि समकालीन विषयांवर ठोस भूमिका मांडणे या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण वक्ता व्हावा, या उद्देशाने तज्ज्ञांनी संवादकौशल्य, विषय मांडणी, माध्यमांशी संवाद आणि संघटनात्मक शिस्त यावर मार्गदर्शन केले.भाजपाची विचारधारा आणि जनसेवेची बांधिलकी अधिक जोमाने जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहू हा विश्वास आहे."

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यासह आमदार पराग अळवणी, आमदार राजहंस सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिका गटनेते गणेश खणकर, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परूळकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.