मुंबई : (Pakistan-Afghanistan War) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ड्युरंड रेषेवरील चकमकी सलग पाचव्या दिवशी सुरू असून, अफगाणिस्तानच्या सैन्याने सीमेवरील काही प्रमुख पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.(Pakistan-Afghanistan War)
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाण हद्दीत केलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली. कंधार प्रांतामधील स्पिन बोल्दाक जिल्ह्यातील तीन चौक्या ताब्यात घेण्यात आल्या, ज्यामुळे तीन पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा आणि एकाला कैद केल्याचा तसेच अली-शेर जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा अफगाण अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या महिन्यात २१ आणि २२ तारखेला पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांनंतर ड्युरंड रेषेवरील तणावात वाढ झाली असून, परिस्थितीवर दोन्ही देशांचे लक्ष केंद्रित आहे.(Pakistan-Afghanistan War)
पाकिस्तानने काबुल आणि बाग्रामवर केलेल्या हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून तालिबानी सैन्याने रावळपिंडीच्या नूर खान एअर बेसवर, बलुचिस्तानच्या क्वेटा येथील १२ व्या डिविजनच्या मुख्यालयावर आणि खैबर पख्तुनवा येथील मोहम्मद एजन्सीच्या ख्वाजाई कँप सह मुख्य लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तालिबानचा हा हल्ला पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या महत्त्वाच्या मिलिट्री तळांपैकी एक आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्यानेही या एअरबेसवर टार्गेट हल्ला केला होता.(Pakistan-Afghanistan War)