मुंबई: (Mumbai Vijaydurg Ro-Ro Service) महाराष्ट्र सागरी मंडळाच्यावतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान आशियातील सर्वात जलद 'एम-टू-एम' रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. रविवार दि. १ मार्च रोजी सकाळी ८ :३० वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार संपन्न झाला. यानंतर बोटीने विजयदुर्गकडे प्रस्थान केले. ही बोट दुपारी ४:१५ च्या दरम्यान विजयदुर्गला पोहोचली या ठिकाणीही प्रवाशांचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Mumbai Vijaydurg Ro-Ro Service)
प्रवाशांच्या सोयीसाठी ₹३,००० पासून ₹९,००० पर्यंतचे विविध तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. केवळ प्रवासीच नव्हे तर वाहनांच्या वाहतुकीसाठीही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रतिसादावरून मुंबई-कोकण प्रवासासाठी ही सेवा किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते. (Mumbai Vijaydurg Ro-Ro Service)
भजनाने आणली प्रवासात रंगत
या प्रवासादरम्यान कोकणवासीयांची खासियत असणाऱ्या भजनी मंडळाने प्रवासात रंगत आणली. विठुरायाच्या जयघोषात आणि प्रभू श्रीरामांच्या रामनामात दंग होत प्रवाशांनी भजनात ताल धरला. (Mumbai Vijaydurg Ro-Ro Service)
तब्बल 42 वर्षानंतर आजींनी केला बोटीने प्रवास
जयवंती राजाराम शिंदे यांनी आपला मुलगा व सून यांच्या समवेत मालवणला जाण्यासाठी विजयदुर्ग पर्यंतचा प्रवास त्यांनी बोटीने केला. यावेळी आपला अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या, वयाच्या 18 व्या वर्षी माझं लग्न झालं त्यानंतर आम्ही बरीच वर्ष म्हणजे साधारण 20 ते 22 वर्ष गावी जाण्यासाठी बोटीनेच प्रवास करायचं. पूर्वीच्या बोटी अवाढव्यात असायच्या मात्र अत्यंत साध्या एवढी सुविधा त्यावेळी नव्हती संपूर्ण बोट ही खुलीच असायची आणि झोपायला खाली अंथरूण चटाया अशी जागा असायची. मात्र आजची ही आधुनिक बोट अत्यंत सुंदर आहे आणि सर्व सुविधांनी युक्त अशी आहे आम्ही यापुढेही जेव्हा जेव्हा कोकणात येऊ तेव्हा विजयदुर्गपर्यंतचा प्रवास तरी आम्ही बोटीनेच करणार आहोत." (Mumbai Vijaydurg Ro-Ro Service)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आज ही बोट सेवा सुरू होते आहे त्यांनी 2014 ते 19 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय हे खातं देखील होतं. त्यावेळी त्यांनी मुंबई आणि कोकण हे जल मार्गाने जोडलं पाहिजे ही मूळ संकल्पना मांडली. यातून पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळेल. यातून आम्हाला कोकणाचा विकास साधना सोपं होईल. आमचे कोकणवासीय जनता वर्षानुवर्षे 1984 पासून या क्षणाची वाट बघत होते. आज ही पहिली बोट सेवा मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होते आहे. निश्चितच या सेवेमुळे कोकणच्या पर्यटन आणि रोजगारास चालना मिळेल. ही रोरो सेवा म्हणजे फक्त सुरुवात आहे आगामी काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग-मालवण, वेंगुर्ला, महाड अशा असंख्य मार्गावर आम्ही आगामी काळात रो रो सेवा सुरू करणार आहोत. म्हणून मी कोकणच्या जनतेला आवाहन करीन की आमच्या या सेवेला अधिकाधिक प्रतिसाद द्यावा.
- नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
ही रोरो सेवा सुरू झाली आणि आमचे विजयदुर्ग आगारही प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. आम्ही विजयदुर्ग ते तराळा मार्गे कणकवली जादा गाडी सोडली. त्याचप्रमाणे विजयदुर्ग ते पडेल कॅन्टीन मार्गे देवगड ज्यादा गाडी सोडली. त्याचप्रमाणे तिसरी सेवा विजयदुर्ग ते पडेल कॅन्टीन दरम्यान सोडली. पुढेही ही सेवा देवगड पर्यंत आम्ही सुरू करणार आहोत. या तीनही गाड्या पूर्ण क्षमतेने धावल्या. यासाठी रोरूस यासाठी रो-रो सुविधेचे आम्ही आभार मानतो सुविधेचे आम्ही अभिनंदन. आगामी काळातही एसटी महामंडळाचे या उपक्रमाला पूर्ण सहकार्य असेल.
- देवरुखकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, विजयदुर्ग आगार
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.