नवी दिल्ली : (Israel US Iran war) मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईत अडकलेल्या १४९ भारतीय प्रवाशांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे. एअर इंडियाच्या AI916D विमानाने मंगळवारी सकाळी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.(Israel US Iran war)
"आपल्या दुबईहून आलेल्या प्रवाशांचे आणि क्रू सदस्यांचे फ्लाइट AI916D वर मनःपूर्वक स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आज नवी दिल्लीमध्ये पोहोचणारे भारतीय कॅरियरचे हे पहिलेच विमान असून, यामध्ये १४९ प्रवाशी आणि ८ ऑपरेटिंग क्रू सदस्य प्रवास करत होते," असे एअर इंडियाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. विमान कंपनीने भारत सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि दुबईतील स्थानिक अधिकाऱ्यांचे उड्डाण सुलभ करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. (Israel US Iran war)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी फुजैरा विमानतळातून स्टार एअर कंपनीची दोन विमानं १६४ प्रवाशांना घेऊन मुंबईत येणार आहेत. यात पुण्यातल्या इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी आणि ठाणे, मुरबाड, अहिल्यानगरमधील नागरिकांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे संकटग्रस्त परिस्थितीतही भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे.(Israel US Iran war)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\