Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धुळवड साजरा न करण्याचा निर्णय

    03-Mar-2026   
Total Views |

ठाणे: (Eknath Shinde)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी धुळवडीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, होळीच्या निमित्ताने सगळ्यांच्या आयुष्यात सप्तरंगाची बरसात होऊ दे, अशी प्रार्थना करत त्यांनी सर्वांना नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरण पुरक होळी साजरी करण्याचे आवाहन केले. (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या सणानिमित्त प्रथेप्रमाणे ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला रंग लावून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Eknath Shinde)

ते म्हणाले की, "यावर्षीची होळी आणि धुलिवंदनावर अजितदादांच्या दु:खद निधनाचे सावट आहे. तसेच शिवसेनेच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरातदेखील दु:खद निधन झाल्यामुळे यावर्षी धुळवडीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि सप्तरंगाची उधळण करणारा ठरो," अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. (Eknath Shinde)

दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष विमान

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे दुबईत अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेतर्फे दोन विशेष विमाने पाठवण्यात आली आहेत. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “काल आणि परवा मी काही लोकांशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही दुबईत अडकलो असून आम्हाला मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यात अनेक माझे परिचित लोक होते. त्यांनी ज्या विमानांची तिकीटे काढली ती विमाने रद्द झाल्याने त्यांची अडचण झाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने दोन विशेष विमाने तिकडे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे अडकलेल्या भारतातील सर्व लोकांना मायदेशी परत आणण्याचे नियोजन केले असून कुणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.” (Eknath Shinde)


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....