मुंबई : (DCM Eknath Shinde) मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकल्याची माहिती देत सरकारकडे मदतीसाठी आवाहन केले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीची तत्काळ दखल घेतली आणि अभिनयला सुखरूप परत आणणार असल्याचे सांगितले. त्यांनी फोनवरुन त्यांच्यांशी संवाद साधला.(DCM Eknath Shinde)
उपमुख्यमंत्री शिंदे धावले मदतीला
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा व्हिडीओ व्हायरल होताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, "लवकरच तुमच्या मुलाला सुखरूप मायदेशात आणले जाईल. त्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्याची व्यवस्था आम्ही करू. तुम्ही काळजी करून नका, काही अडचण असेल तर संपर्क साधा", असे म्हणत विशाखा सुभेदार यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.(DCM Eknath Shinde)
Watch: Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde had a phone call with actress Vishaka Subhedar, whose son is stuck in Kuwait. Eknath Shinde assured her that he will bring him back to India
विशाखा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमध्ये गेले चार दिवस अडकल्याचे सांगितले. यावेळी, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक साद घालत मुलाला भारतात परत आणण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, कुवेतमध्येही काही भारतीय नागरिक अडकले आहेत. विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा लंडनला जात होता. कुवेतमध्ये त्याच्या विमानाचे लेओव्हर असल्याने उतरावे लागले. पण, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द केली आणि तोही कुवेतमध्येच अडकला आहे. यासंदर्भात विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.(DCM Eknath Shinde)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\