Navnath Ban: खरात कडून राऊत यांनी किती रुपयाची दलाली घेतली ?: नवनाथ बन

29 Mar 2026 18:51:45
 
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात संजय राऊत हे महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या पाण्याचे समर्थन करत आहेत. माझा संजय राऊत यांना प्रश्न आहे की, या अशोक खरात कडून संजय राऊत यांनी किती रुपयाची दलाली घेतली?जे पाणी शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्तांना द्यायला हवे होते ते पाणी मविआने भोंदूबाबा खरातला दिले. आणि दुर्दैवाने संजय राऊत याचे समर्थन करत आहेत. नाशिक चे संपर्कप्रमुख असताना संजय राऊत आणि खरातचा संपर्क आला का?याच उत्तर राऊत यांनी राज्याला दिले पाहिजे." असा परखड प्रश्न भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.२९ रोजी राऊत यांना विचारला. (Navnath Ban)
 
" तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी भोंदू बाबासाठी पायघड्या घातल्या होत्या. मग त्यांना सहआरोपी करायचं का ? याच उत्तर राऊत यांनी द्यावे. भोंदू बाबा प्रकरणात राज्य सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरण अतिशय गंभीरपणे हाताळले आणि कारवाईचे आदेश देऊन या भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याच काम केलं.या प्रकरणाची एस आय टी चौकशी सुरू आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार म वि आ चे होते."असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
 
"देशात किंवा राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. ६० दिवस शिल्लक राहील इतके इंधन आपल्याकडे आहे. महाराष्ट्रातही गॅस ची टंचाई नाही.उलट बुकिंग केल्यानंतर २५ दिवसात गॅस सिलिंडर मिळते.तरीही राऊत अफवा पसरवण्याच काम करत आहेत. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. राऊत यांचा राज्य आणि देश पेटविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. तसेच राऊत फक्त गुजरातवर घसरण्याचे काम करत आहेत. इथल्या मराठी माणसाने राऊत आणि त्यांच्या पक्षाला नाकारले आहे." असेही बन म्हणाले. (Navnath Ban)
 
 
Powered By Sangraha 9.0