मुंबई : (Max City Literature Festival) मुंबईतील नॅशलन गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट येथे आयोजित ‘मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल’च्या पहिल्या दिवसाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. विविध वयोगटांतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Max City Literature Festival)
पारंपरिक दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यानंतर दिवसभर विविध विषयांवर दर्जेदार व विचारप्रवर्तक सत्रांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सत्र “मुंबई: बिटवीन ए क्यू आय अँड ड्रीम्स” मध्ये भारत घोटोसकर, लुईस मिरांडा, निधी चौधरी आणि आर. वेंकटेश यांनी मुंबईतील नागरी जीवनातील आव्हाने, स्वप्ने आणि वास्तव यांचा सखोल वेध घेतला. (Max City Literature Festival)
यानंतर “हिडन अँड कोल्ड वॉर्स” या सत्रात मंगेश सावंत, सचिन देवधर, संजीव चोपरा आणि विभू वैभव यांनी जागतिक राजकारणातील पडद्यामागील संघर्षांवर प्रकाश टाकत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. (Max City Literature Festival)
दिवसभरातील विशेष आकर्षण ठरलेल्या “५ अॅसॅसिनेशन्स अँड अन आर्म्स डील: द सुंदरजी स्टोरी” या सत्रात प्रोबल दास गुप्ता आणि संदीप उन्नीथन यांनी १९८० च्या दशकातील घडामोडींवर तसेच ‘जनरल ब्रास्टॅक्स’ या पुस्तकावर आधारित रोचक संवाद साधला. त्यानंतर “बिटवीन ब्रेकपॉईंट अँड बिगिनिंग्स” या सत्रात सौरभ मुखर्जी, शिंन्जीनी कुमार आणि रजनी पानीकेर यांनी कामकाज, संपत्ती आणि महिलांच्या बदलत्या भूमिकांवर सखोल चर्चा केली. (Max City Literature Festival)
दुपारच्या सत्रात मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी तर्फे १९४६ च्या नौदल उठावावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. त्यानंतर “१९४६ चे स्वातंत्र्याचे शेवटचे युद्ध” या विषयावरील चर्चेत प्रमोद कपूर, कोमोडोर श्रीकांत केसनुर आणि संदीप उन्नीथन सहभागी झाले. या चर्चेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या पण कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायावर प्रकाश टाकण्यात आला. (Max City Literature Festival)
इतिहासप्रेमींसाठी “द माईटी चोलाज” या सत्रात अमिश त्रिपाठी, एस. क्रिशनन, डॉ. कजारी कमल यांनी चोल साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची मांडणी केली. (Max City Literature Festival)
पहिल्या दिवसाचा समारोप वाईस ॲडमिरल क्रीश्ना स्वामीनाथन, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांच्या प्रेरणादायी ‘फायरसाईड चॅट’ने झाला. एकूणच, विचारप्रवर्तक चर्चा, विविध विषयांची समृद्ध मांडणी आणि मोठ्या प्रमाणातील प्रतिसादामुळे ‘मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल’चा पहिला दिवस यशस्वी ठरला असून पुढील सत्रांसाठी उत्सुकता अधिकच वाढली आहे. (Max City Literature Festival)