वाढत्या टेक्नॉलॉजी मुळे गुन्हेगारी स्वरूप बदलले; देवेंद्र फडणवीस
29-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते '६९ वे ऑल इंडिया पोलीस ड्यूटी मीट २०२५-२०२६' चे उदघाटन रविवार दि.२९ रोजी नागपूर येथे पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, "वाढत्या टेक्नॉलॉजीने जसे सर्वसामान्यांचे जीवन बदलले आहे, तसेच ते गुन्हेगारांचेही बदलेले आहे. गुन्हेगारी आता 'स्ट्रीट क्राईम'पासून 'व्हाईट कॉलर क्राईम' आणि 'सायबर क्राईम' पर्यंत पोहोचली आहे.पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहे. भारतातील केंद्रीय व राज्य पोलीस दलांचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करत, विविध आव्हानांवर मात करत पोलिसांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात तीन महत्त्वपूर्ण कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष संहिता आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता अंमलात आणण्यात आले असून, या कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहे."
"सायबर क्राईमपासून ते डिजिटल अरेस्टपर्यंतसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. सायबर आधारित गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना शासन होताना पाहायला मिळत आहे. ही बाब अत्यंत सुखावणारी आहे.महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सक्षम पोलीस दलांपैकी एक असून, सायबर गुन्ह्यांच्या उकल करण्यातही महाराष्ट्र पोलीस दल आघाडीवर आहे. तसेच, अत्याधुनिक सायबर लॅब आणि एआय आधारित प्रणाली विकसित करून महाराष्ट्र देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.