Ashok Kharat case: खरात प्रकरणात ‘शिवनिका’ संस्थेवर एसआयटीचा फोकस; रुपाली चाकणकरांसह पोलिसांच्या रडावर आणखी कोणकोण?

29 Mar 2026 17:16:17


 
Ashok Kharat case


मुंबई : (Ashok Kharat case) भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांसह आर्थिक व्यवहारांचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, विशेष तपास पथकाने (SIT) आपला मोर्चा त्याच्याशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातने स्थापन केलेल्या ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार आता SIT च्या रडारवर आले आहेत. या संस्थेतील सर्व आजी-माजी सदस्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Ashok Kharat case)

माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, ‘शिवनिका’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम पार पडले होते. आता SIT कडून संस्थेचे बँक व्यवहार तपासले जात आहेत. मागील काही वर्षांतील आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.निधीचा वापर आणि खरातला मिळालेलं पाठबळ तपासलं जात आहे. या चौकशीतून मोठे आर्थिक घोटाळे आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ashok Kharat case)


रुपाली चाकणकर अडचणीत?


या प्रकरणात आधीच चर्चेत असलेल्या रूपाली चाकणकर यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. SIT कडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता असून, लवकरच त्यांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात. खरातशी असलेल्या कथित संबंधांमुळे त्यांच्यावर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Ashok Kharat case)


शिवनिका’ संस्थेच्या विश्वस्त मंडळातील नावे (Ashok Kharat case)


कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात


डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके


सौ. कल्पना अशोककुमार खरात


ना. सौ. रूपाली निलेश चाकणकर


श्री. सुभाषराव केशवराव जमे


श्री. ललित प्रकाश गोफणे (C.A.)


डॉ. नंदकिशोर तुकाराम काटोरे



 
Powered By Sangraha 9.0