मुंबई : (Ashok Kharat case) सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक विधान केले आहे. “रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी नव्हतीच. तो त्यांच्या पक्षांतर्गत दबावाचा भाग असू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Ashok Kharat case)
अंधारे पुढे म्हणाल्या की, “उद्या जर चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता असेल, तर पदावर असताना अटक होणे पक्षाच्या प्रतिमेसाठी धोकादायक ठरले असते. त्यामुळेच आधीच राजीनामा घेण्यात आला असावा,” असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. रूपाली चाकणकर यांना भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात याची तब्बल १२ ते १३ वर्षांपासून ओळख असल्याचा दावा करत अंधारेंनी या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे म्हटले. “खरातसारख्या व्यक्तीला इतक्या वर्षांपासून कोणी पोसले? त्याला शस्त्र परवाना कोणी दिला? त्याच्या ट्रस्टला निधी कोणी दिला?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. (Ashok Kharat case)
हेही वाचा: Ashok Kharat forensic raid: खरातचा ‘डिजिटल खजिना’ उघडणार? ओकस ऑफिसमध्ये फॉरेन्सिक तपास...
“गेल्या १६ वर्षांपासून त्याचे प्रकार सुरू होते. म्हणजेच हजारो पीडित असू शकतात. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी ठाम मागणीही त्यांनी केली. (Ashok Kharat case)
याशिवाय अंधारेंनी दीपक केसरकर यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “ते शालेय शिक्षण मंत्री असताना एमआयडीसी परिसरात काय करत होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ‘जगदंब पतसंस्था’शी संबंधित मनकर्ण आवारे या व्यक्तीचा उल्लेख करत, “खरात आणि या संस्थेमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचा संशय आहे. चाकणकर यांच्यासोबतही हीच व्यक्ती दिसते. त्यामुळे आवारे यांचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अंधारेंनी केली. (Ashok Kharat case)
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat case)