Income Tax Act 2026: १ एप्रिलपासून PF-ग्रॅच्युइटी वाढणार? पगारावर बसणार का कात्री? जाणून घ्या काय आहेत नवीन नियम...

28 Mar 2026 16:43:22
 
Income Tax Act 2026
 
नवी दिल्ली : (Income Tax Act 2026) नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०१६ पासून कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आयकर कायदा २०२५ आणि प्राप्तिकर नियम २०२६ लागू होत असल्याने पगाराच्या रचनेवर थेट परिणाम होणार आहे. (Income Tax Act 2026)
 
तज्ज्ञांच्या मते, एकूण CTC (कॉस्ट टू कंपनी) समान राहिली तरी टेक-होम सॅलरी कमी होऊ शकते. कारण नवीन नियमांनुसार अनेक भत्ते आणि सुविधा आता करपात्र ठरणार आहेत. (Income Tax Act 2026)
 
नवीन नियमानुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे एकूण CTC च्या किमान ५०% ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे PF (प्रॉव्हिडंट फंड) आणि ग्रॅच्युइटीचे योगदान वाढणार, परिणामी हातात मिळणारा पगार कमी होण्याची शक्यता आहे. (Income Tax Act 2026)
 
याशिवाय, पूर्वी करमुक्त असलेले अनेक भत्ते आता कराच्या कक्षेत येणार आहेत. कंपनीकडून दिलेले घर, वाहन, चालक, वीज, पाणी, गॅस बिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, क्लब सदस्यत्व, गिफ्ट्स, क्रेडिट कार्ड खर्च हे सर्व आता करपात्र उत्पन्नात जोडले जाणार आहेत. कंपन्या नवीन नियमांनुसार सॅलरी स्ट्रक्चर पुन्हा डिझाइन करू शकतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराच्या ब्रेकअपकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. (Income Tax Act 2026)
 
दरम्यान, जुन्या आणि नवीन करप्रणालीत निवड करताना देखील विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. जुन्या प्रणालीमध्ये सूट आणि वजावटींचा फायदा मिळतो, तर नवीन प्रणाली सोपी असली तरी सूट मर्यादित आहे. एकूणच, १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार असून, पगाराची रचना समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. (Income Tax Act 2026)
 
 
Powered By Sangraha 9.0