'धुरंदर २' ने मोडले रेकॉर्ड; करण जोहरने केले कौतुक म्हणाला...

28 Mar 2026 18:08:08
Dhurandhar 2
 
मुंबई : (Dhurandhar 2) आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-अ‍ॅक्शन सिक्वेल 'धुरंदर: द रिवेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. नुकतेच बॉलीवुड दिग्दर्शक करण जोहर याने सोशल मिडियावर भलीमोठी पोस्ट टाकत 'धुरंदर २' चे जोरदार कौतुक केले आहे.
 
करण जोहरने यात म्हटले आहे की, टेस्टोस्टेरॉन, हायपर अल्फा एनर्जी आणि खोलवर रुजलेल्या देशभक्तीवरील चर्चा तर व्हायलाही हव्यात. पण धुरंधर २ यापेक्षा खूप काही अधिक आहे. जसकीरतची ही हदय पिळवटून टाकणारी कथा आहे. आपल्या मातृभूमीसाठी दिलेले बलिदान आणि खलनायकाच्या पात्रातही अनेक पैलु आहेत. जबरदस्त कामगिरी, साउंडस्टेप आणि सिनेमॅटिक कौशल्य हे आदित्य धरची दिग्दर्शकीय प्रभुत्व सिद्ध करते. आदित्य धर एक नवा आणि अप्रतिम दिग्दर्शक आहे जो बॉक्स ऑफिसचे सगळे रेकाँर्ड तोडणार आणि नवीन रेकाँर्ड बनवणारच आहे.
 
हेही वाचा : 'धुरंदर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'?
 
करण जोहरने पुढे असेही म्हटले आहे की, रणवीर सिंग तू काय आहेस यार, तुझ्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम परफाँर्मन्स आहे. या चित्रपटातील प्रत्येक अश्रू, प्रत्येक क्षण हेच सिध्द करते की तू एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. पुढील अनेक वर्षे रणवीर ‘धुरंधर’ मूव्ही स्टार म्हणून ओळखला जाईल, असंही त्याने नमूद केलं.
 
करण जोहर पुढे असेही म्हटले आहे की, हा चित्रपट पाहताना ७० च्या दशकातील सिंगल स्क्रीन थिएटरमधील अस्सल हिंदी सिनेमाचा अनुभव पुन्हा एकदा मिळाला. “आज मी या इंडस्ट्रीचा भाग आहे याचा मला अभिमान वाटतो.
 
दरम्यान धुरंदरची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच असून, या चित्रपटाने केवळ नऊ दिवसांतच ७१५.७२ कोटी रुपयांची कमाई केली असुन, या चित्रपटाची एकूण कमाई ८५४.९९ कोटी रूपये इतकी झाली आहे. आता हा चित्रपट दुसऱ्याच विकेंडला १,००० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0