नवी दिल्ली : (Aviation Rules) दोन महिन्यांपूर्वी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) VVIP आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांबाबत कडक नियम लागू केले आहेत. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला होता. (Aviation Rules)
नवीन नियमांनुसार, विमान उड्डाणाबाबत पायलटचा निर्णय अंतिम असेल आणि कोणत्याही परिस्थितीत त्यावर दबाव आणता येणार नाही. जर तांत्रिक कारणांमुळे पायलटने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर तो निर्णय बंधनकारक असेल. (Aviation Rules)
कोणावर लागू होणार नियम?
हे नियम खालील VVIP व्यक्तींसाठी लागू असतील:
लोकसभा अध्यक्ष
राज्यसभा उपसभापती
मुख्यमंत्री
राज्यपाल
केंद्रीय मंत्री
भारताचे सरन्यायाधीश
दबाव टाकल्यास कठोर कारवाई...
DGCAने स्पष्ट केले आहे की, विमान कर्मचाऱ्यांवर उड्डाणासाठी दबाव टाकल्यास सुरक्षेला धोका निर्माण होतो. नियमांचे उल्लंघन केल्यास विमान कंपनीचा परवाना आणि पायलटचे लायसन्स रद्द होऊ शकते. (Aviation Rules)
तांत्रिक नियम अधिक कडक...
सर्व VVIP उड्डाणांसाठी दुहेरी इंजिन असलेली विमाने अनिवार्य.
किमान दोन सदस्यांचा क्रू आवश्यक.
हवामान रडार आणि नेव्हिगेशन प्रणाली पूर्णपणे कार्यरत असणे बंधनकारक.
कोणताही बिघाड असल्यास उड्डाणापूर्वी दुरुस्ती आवश्यक.
क्रूशी थेट संपर्काला मनाई- VVIP प्रवाशांनी उड्डाणातील बदलांसाठी थेट पायलट किंवा क्रूशी संपर्क साधू नये. सर्व बदल विमान कंपनीच्या व्यवस्थापनामार्फतच करावेत. (Aviation Rules)