मुंबई : (Ashok Kharat hawala case) भोंदूगिरी करत महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेला अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. एसआयटीच्या तपासात आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला असून, खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Ashok Kharat hawala case)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा परदेशात पैसे पाठवण्यासाठी हवाला मार्गाचा वापर करत होता. या पैशांची देवाण-घेवाण थेट दुबई पर्यंत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही प्रभावशाली व्यक्ती आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat hawala case)
यामुळे हे प्रकरण केवळ लैंगिक शोषण आणि फसवणुकीपुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्ह्याकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. एसआयटीला यासंदर्भात काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती असून, आगामी काळात गुन्ह्यांचे स्वरूप आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat hawala case)
दरम्यान, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या प्रकरणात एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. (Ashok Kharat hawala case)
नेवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत यांना व्यवसाय वृद्धीसाठी विविध अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, “मी महादेवाचा अवतार असून माझ्यासोबत संबंध ठेवल्यास संकट दूर होईल, अन्यथा कुटुंबाचा मृत्यू होईल,” अशी धमकी देत तिचे शोषण करण्यात आले. (Ashok Kharat hawala case)
आत्तापर्यंत अशोक खरात विरोधात एकूण १० गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी ८ लैंगिक शोषणाचे तर २ आर्थिक फसवणुकीचे आहेत. याशिवाय १०० पेक्षा अधिक तक्रारी फोनद्वारे प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या एसआयटीकडून सखोल तपास सुरू असून, या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, पीडितांची संख्या आणि संभाव्य सहकारी यांचा शोध घेतला जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat hawala case)