मुंबई : (Ashok Kharat forensic raid) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास अधिकच वेगाने सुरू असून, न्यायालयात हजर करण्यापूर्वी एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिकमधील “ओकस प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स” या कार्यालयात सध्या सखोल तपासणी सुरू आहे. (Ashok Kharat forensic raid)
नाशिक येथील या कार्यालयात फॉरेन्सिक आणि एसआयटी पथक सलग तिसऱ्या दिवशीही पंचनामा करत असून, संगणक, हार्डडिस्क, फाइल्स, बँक व्यवहारांची नोंद आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र जप्त करून तपासले जात आहेत. डिजिटल आणि फिजिकल पुराव्यांची बारकाईने छाननी केली जात आहे. (Ashok Kharat forensic raid)
तपासादरम्यान अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून. सावकारी, जमिनीच्या बक्षीसपत्रांद्वारे फसवणूक आणि बेकायदेशीर जमीन व्यवहार यांसारख्या गंभीर आरोपांची चौकशी सुरू आहे. (Ashok Kharat forensic raid)
हेही वाचा: Ashok Kharat hawala case: भोंदू खरातचा ‘हवाला कनेक्शन’...?, गुन्ह्यांचा आकडा वाढतोय?
याशिवाय, दुबईसह परदेशी कनेक्शनद्वारे पैसे पाठवण्यासाठी हवाला रॅकेटचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुबईपर्यंत पैशांचा मागोवा घेत बँक ट्रान्झॅक्शन, परकीय चलन व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय लिंक तपासल्या जात आहेत. (Ashok Kharat forensic raid)
दरम्यान, आरोपीची सध्याची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यापूर्वी पुरावे अधिक भक्कम करण्याचे काम सुरू आहे. काल नोंदवण्यात आलेल्या दोन नवीन गुन्ह्यांचाही तपास वेगाने सुरू असून, त्यामध्ये जमीन फसवणूक, बक्षीसपत्र घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार यांचा समावेश असल्याची माहिती आहे. (Ashok Kharat forensic raid)
सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले असून, अशोक खरात प्रकरणात डिजिटल पुरावे आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक कनेक्शनमुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat forensic raid)