मुंबई : (US-Israel-Iran War) गेल्या काही आठवड्यापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण इराणने केलेल्या विनंतीनंतर त्यांच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत - सुविधांवरील हल्ले १० दिवसांसाठी स्थगित करत असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे या दोन देशांमध्ये संघर्ष सुरूच असला तरी राजनैतिक चर्चेसाठी मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(US-Israel-Iran War)
नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, "इराणी सरकारच्या विनंतीनुसार, मी ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी म्हणजेच सोमवार, ६ एप्रिल २०२६ रात्री ८ वाजेपर्यंत, ईस्टर्न टाईम स्थगित करत आहे," या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणबरोबर वाटाघाटी सुरू आहेत आणि त्यामध्ये चांगल्या प्रगतीचे चिन्ह दिसून येत असल्याचेही सूचित केले आहे. "चर्चा सुरू आहे आणि ती अत्यंत चांगल्या प्रकारे चालली आहे," असे ट्रम्प म्हणाले आहेत.(US-Israel-Iran War)
मात्र ट्रम्प यांनी जाहीर केलेला हा १० दिवसांच्या विरामामुळे तात्पुरती शांतता राहाणार की यामुळे व्यापक प्रमाणात युद्धबंदीचा निर्णय होईल हे मात्र स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांच्या निवेदनात हल्ले आणखी काही दिवस थांबवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट अटी घालण्यात आल्या याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र इराणने विनंती केल्याचा उल्लेख असल्याने काही प्रमाणात दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवाद झाला असल्याची शक्यता दिसून येते.(US-Israel-Iran War)