Petrol Diesel Excise Duty Cut: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

27 Mar 2026 12:18:05

Petrol Diesel Excise Duty Cut

मुंबई : (Petrol Diesel Excise Duty Cut)
सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असताना, सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.(Petrol Diesel Excise Duty Cut)

पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता प्रति लिटर ३ रुपये झाले आहे, तर डिझेलवरील शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Petrol Diesel Excise Duty Cut)

सध्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती $70 ते $122 प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या असून, भारताने जागतिक अस्थैर्यामुळे ग्राहकांना संरक्षण देण्याचा मार्ग निवडला आहे. तेल कंपन्यांना पेट्रोलवर २४ रुपये आणि डिझेलवर ३० रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे, तरीही सरकारने नागरिकांचा रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या उपाययोजनेमुळे भारतीय ग्राहक जागतिक तेल बाजारातील अस्थैर्यापासून सुरक्षित राहतील आणि आर्थिक दिलासा मिळेल.(Petrol Diesel Excise Duty Cut)


Powered By Sangraha 9.0