उन्हाळ्यात ‘डिटॉक्स वॉटर' का आवश्यक? वाचा फायदे

27 Mar 2026 17:52:09
Detox Water
 
फळे, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात भिजवून तयार केलेल्या पेयाला डिटॉक्स वॉटर म्हणतात. लिंबू, काकडी, पुदिना आणि आले यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे हे पाणी शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.हे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवते आणि पचन सुधारण्यास सहाय्य करते. मात्र, अतिसेवनामुळे पोटदुखी, इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि डिहायड्रेशन सारखे दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे हे डिटॉक्स वॉटर योग्य प्रमाणातच प्यावे.
 
Detox Water
 
शरीर हायड्रेट ठेवते
 
डिटॉक्स वॉटर चविष्ट असल्यामुळे आपण ते जास्त प्रमाणात पितो, ज्यामुळे दिवसभर शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते.
Detox Water
 
रोगप्रतिकारशक्ती वाढते
 
लिंबू आणि बेरी व्हिटँमिन सी युक्त असते यामुळे हे डिटॉक्स वॉटर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
Detox Water  
 
त्वच्या चमकदार होते
 
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडल्यामुळे त्वचेवरील पिंपल्स, मुरुमे कमी होतात आणि त्वचा तजेलदार व निरोगी होते.
Detox Water  
 
पचनशक्ती सुधारते
 
आले, लिंबू किंवा जिरे घातलेले पाणी पचनक्रिया सुधारते. नियमित सेवनाने आतड्यांमधील घाण साफ होते आणि बद्धकोष्ठतेपासून ही आराम मिळतो.
 
Detox Water
 
शरीर हायड्रेटेड राहते
 
डिटॉक्स वॉटरमध्ये फळे आणि भाज्यांचे नैसर्गिक पोषक घटक मिसळलेले असल्यामुळे ते साध्या पाण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते आणि दिवसभर शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
Detox Water  
 
डिटॉक्स वॉटर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते
 
डिटॉक्स वॉटर शरीरातील अवयव, यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ ठेवते , ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
 
Powered By Sangraha 9.0