जेन-झी चळवळीचा चेहरा म्हणून उदयास शाह नेपाळचे ४७वे पंतप्रधान ठरले आहेत. शाह यांनी पूर्व नेपाळातील झापा-५ मतदारसंघात माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा ४९,६१४ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. शाह यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ओली यांना १८,७३४ मते मिळाली. १९९१ नंतरच्या नेपाळच्या संसदीय निवडणुकांमध्ये कोणत्याही उमेदवाराला मिळालेल्या मतांपैकी हे सर्वाधिक मत असल्याचे मानले जाते.(Balendra Shah)
हिंदू आणि बौद्ध परंपरेनुसार शपथविधी
राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत 'शीतल निवास' येथे दुपारी १२:३४ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा अप्रतिम संगम बघायला मिळाला. यावेळी, ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ युवा ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले तसेच १०७ लामांनी बौद्ध मंत्रांचे पठण केले.(Balendra Shah)
कोण आहेत बालेंद्र शाह?
बालेंद्र शाह हे ३५ वर्षांचे संगीतकार असून २०२२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवून विजय मिळवला. नेपाळमधल्या मधेशी या भागातले ते पंतप्रधानपदी पोहोचलेले पहिले व्यक्ती ठरतील. नुकत्याच मार्च २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने २७५ पैकी १८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.
(Balendra Shah)