US-Israel-Iran War : इराणच्या सागरी सामर्थ्याला मोठा धक्का! इस्रायली हल्ल्यात IRGCचे नौदल कमांडर ठार; इस्रायलचा दावा

26 Mar 2026 15:58:37


US-Israel-Iran War

मुंबई : (US-Israel-Iran War)
मध्य पूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्या सुरु असलेल्या युद्धाला आता २६ पूर्ण झाले आहेत. या युद्धाचा ज्वर कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यादरम्यान, आता इराणच्या नौदलाचे कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्त्रायलने होर्मुझवर केलेल्या हल्ल्यामध्ये अलीरेजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्त्रायलकडून देण्यात आली आहे. हा इराणसाठी आणखी एक मोठा झटका मानला जात आहे. मात्र, इराणकडून या घटनेची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.(US-Israel-Iran War)

इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, इराणने तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांना होर्मुजचा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे आम्ही या सामुद्रधुनीजवळ हल्ला केला, या हल्ल्यामध्ये कमांडर अलीरेज़ा तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कमांडर अलीरेज़ा तंगसिरी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नौदलाचे प्रमुख होते. या मार्गाने जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र या हल्ल्यात आता त्यांचा मृत्यू झाला आहे.(US-Israel-Iran War)

इराणच्या सागरी सामर्थ्याचे रणनीतिकार

प्राथमिक अहवालानुसार, अलीरेझा तंगसिरी हे एखाद्या महत्त्वाच्या मोहिमेवर अब्बास बंदर येथे असताना हा हल्ला झाला. ते होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणच्या आक्रमक सागरी धोरणाचे मुख्य शिल्पकार मानले जात होते.IRGC नौदलाचे कमांडर म्हणून त्यांनी इराणची सागरी क्षमता वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले, अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारे देणारी विधानं वारंवार केली, तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. बंदर अब्बास हा इराणचा सर्वात महत्त्वाचा नौदल तळ असून, पर्शियन आखातावर संपूर्ण नजर ठेवण्याचे केंद्र मानले जाते. त्यामुळे येथे झालेला हल्ला अत्यंत गंभीर मानला जात आहे.(US-Israel-Iran War)

परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता

या हल्ल्यानंतर तणावात वाढ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. लष्करी तज्ञांच्या मते, तंगसिरींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून प्रतिहल्ले होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळू शकते. स्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, येत्या काही तासांत किंवा दिवसांत या प्रकरणावर इराणकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.(US-Israel-Iran War)



Powered By Sangraha 9.0