'धुरंदर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'?

26 Mar 2026 16:00:43
Operation Sindoor
 
मुंबई : (Operation Sindoor) बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणारा धुरंदर २ नंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजच्या बॅनरखाली केली जाणार आहे.
 

या चित्रपटाची धुरा निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सांभाळणार आहेत. 'द कश्मीर फाईल्स' आणि 'द वैक्सीन वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनीच पार पाडले होते.
 


हेही वाचा : “बॉक्स ऑफिसचा बाप” रजनीकांत यांनी थोपाटली दिग्दर्शक आदित्य धरची पाठ म्हणाले....

 
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा चित्रपट पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या लष्करी कारवाईवर आधारित आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर,  भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत घेतले होते. या मोहिमे अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केले गेला होता.  याच धाडसी मोहिमेवर आधारित हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

दरम्यान,‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू होणार असुन , यात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार दिसणार याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आता या चित्रपटाची उत्सुकत्ता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
 


 
Powered By Sangraha 9.0