रामनवमीच्या शुभेच्छांत रामच नाही! ममतादीदींचे मतपेढीचे राजकारण पुन्हा चव्हाट्यावर

26 Mar 2026 16:48:48
Mamata Banerjee
 
मुंबई : (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या निमित्ताने समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या खऱ्या; परंतु शुभेच्छांमध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमाच वापरली नाही. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेय. रामनवमीसारख्या महत्त्वाच्या हिंदू सणाच्या शुभेच्छांमध्ये रामाची प्रतिमा टाळण्यात आल्याने विरोधकांनी याला 'मतपेढीचे राजकारण' म्हणून संबोधले. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, ही भूमिका जाणीवपूर्वक घेतली असल्याचा आरोप करत ममतादीदींवर जोरदार टीका केल्या आहेत.
 
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेय. एकीकडे तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याचे भगवान श्रीरामांबाबतचे वादग्रस्त विधान, तर दुसरीकडे रामनवमीसाठी तयार होत असलेल्या मूर्तीची विटंबना या दोन घटनांमुळे यापूर्वीच वाद निर्माण झालेत. टीएमसीचे नेते चंद्रनाथ सिन्हा यांनी एका प्रचार सभेदरम्यान 'भगवान राम हे उत्तर भारतातील देव आहेत, ते पश्चिम बंगालमध्ये चालणार नाहीत असे वक्तव्य केले होते. नंदीग्राममधील वेटुरिया बसस्थानक परिसरात रामनवमीसाठी तयार होत असलेल्या भगवान रामांच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांकडून प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत.
 
पश्चिम बंगालमध्ये धार्मिक आणि सामाजिक समीकरणे लक्षात घेता सर्व पक्ष आपापल्या रणनीती आखत आहेत. घडलेल्या सर्व घडामोडींमुळे रामनवमीसारखा धार्मिक उत्सवही राजकीय चर्चेचा विषय ठरला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा मुद्द्यांवरून वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
हेही वाचा : Ashok Kharat Farmhouse Scam: “तुर्कस्थानहून २.५ कोटींचा..., नाही तर तुझा मृत्यू...!” भोंदू खरातच्या फार्महाऊसचा थरारक खुलासा...
 
वोटबँकेच्या लालसेपोटी केलेले राजकारणच
 
ममतादीदींनी एकीकडे रामनवमीच्या शुभेच्छा देणे आणि त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने रामाविषयी वादग्रस्त विधान करणे, हे निव्वळ वोटबँकेच्या लालसेपोटी केलेले राजकारणच म्हणावे. प्रभू श्रीराम धर्माचे साक्षात स्वरूप आहेत, असे स्वतः महर्षी वाल्मिकींनीसुद्धा मानले होते. श्रीराम हे सर्वत्र आहेत, अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. हिंदूंचे सण-उत्सव आले की, उभारलेल्या पंडालवर कट्टरपंथींद्वार हल्ले होतात, मात्र त्यानंतर हिंदूंना योग्य न्याय मिळत नाही. तेव्हा ममतादीदींचे हिंदुत्व कुठे जाते? त्यामुळे अशा छद्मविचारसरणीपासून हिंदूंनी सावध राहायला हवे.
 
- स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, राष्ट्रीय महामंत्री, अखिल भारतीय संत समिती
 
 
Powered By Sangraha 9.0