Maharashtra Weather Alert : कोकणात गडगडाटासह जोरदार पाऊस, काही भागांत गारपीट! हवामान विभागाकडून पुढील २४ तासांचा इशारा

26 Mar 2026 19:20:10

Maharashtra Weather Alert

मुंबई : (Maharashtra Weather Alert)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह अनेक ठिकाणी आज ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. काही भागांमध्ये गारपीटही झाली असून वातावरणात अचानक बदल पाहायला मिळाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(Maharashtra Weather Alert)

तापमानात वाढ

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमानात काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या राज्यभर अंशतः ढगाळ वातावरण असून ही स्थिती संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्याच्या दक्षिण पट्ट्यात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.(Maharashtra Weather Alert)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्चदरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वारे आणि काही भागांत गारपिटीची शक्यता आहे. ३१ मार्चलाही या हवामान बदलाचा परिणाम जाणवू शकतो.(Maharashtra Weather Alert)

शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

या दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. नुकतीच काढणी केलेली रब्बी पिकं सुरक्षित ठेवण्याचा, हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याचा आणि आवश्यक ती बचावात्मक पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Alert)


Powered By Sangraha 9.0