मुंबई : (Maharashtra Budget Session) गेल्या एक महिन्यापासून विधानभवन मुंबई सुरु असलेल्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अखेर बुधवारी सूप वाजले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत २० दिवस सभागृहाचे कामकाज चालले तर, ११ दिवस सुट्या आल्यामुळे त्यादिवशी कामकाज बंद होते. याकाळात एकूण बैठकींची संख्या २० होती. १९७ तास २७ मिनिटे प्रत्यक्षात कामकाज झाले तर, अन्य कारणांमुळे १५ मिनिटे वेळ वाया गेला असून मंत्री उपस्थित नसल्याने १ तास वेळ वाया गेला. रोजचे सरासरी कामकाज ९ तास ५० मिनिटे चालले. यात ९ हजार ३६० प्राप्त प्रश्न, ५७१ स्वीकृत प्रश्न, १०५ उत्तरित झालेले प्रश्न, २ हजार २८७ अतारांकित प्रश्न होते. तर, ३ हजार १०३ लक्षवेधी सुचना, ४८६ स्वीकृत सुचना, चर्चा झालेल्या सूचना १२५, नियम ९७ अन्वये प्राप्त सूचना ८६, शासकीय विधेयके २२, अशासकीय विधेयके ३५ असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिली.
हेही वाचा : रामनवमीच्या शुभेच्छांत रामच नाही! ममतादीदींचे मतपेढीचे राजकारण पुन्हा चव्हाट्यावर
आमदारांची उपस्थिती किती?
अधिवेशनात आमदारांची अधिकाअधिक ८६.५३ टक्के उपस्थिती होती, कमीत कमी उपस्थिती ५४.६९ टक्के होती. एकूण सरासरी उपस्थिती ७८.८४ टक्के होती, अशी माहितीही विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिली
हे वाचलत का? - Ashok Kharat Office Sealed: भोंदू खरातचं ऑफिस सील! बँक खातेही...
पुढील अधिवेशन २२ जुनला
राज्याचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. २२ जुन २०२६ रोजी विधानभवन मुंबई येथे होणार आहे.