Iran toll tax on Strait of Hormuz : इराणची मोठी खेळी! होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना आता टोल भरावा लागणार; लवकरच कायदा आणणार

26 Mar 2026 18:20:43

Iran toll tax on Strait of Hormuz

मुंबई : (Iran toll tax on Strait of Hormuz)
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक असलेल्या या अरुंद सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून ‘टोल’ म्हणजेच शुल्क आकारण्याचा नवीन कायदा इराणची संसद आणण्याच्या तयारीत आहे. (Iran toll tax on Strait of Hormuz)

इराणचा प्रस्ताव काय आहे?

‘फार्स’ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इराणच्या संसदेत सध्या एका विधेयकाचा आराखडा तयार केला जात आहे. या प्रस्तावानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर सुरक्षा आणि देखरेखीच्या कारणास्तव शुल्क आकारले जाणार आहे. येत्या आठवड्यात या विधेयकाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदारांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे सार्वभौमत्व, नियंत्रण आणि देखरेख याला कायद्याने औपचारिक मान्यता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. टोल वसुलीमुळे देशासाठी एक स्वतंत्र महसूल स्रोतही निर्माण होईल.” (Iran toll tax on Strait of Hormuz)

दरम्यान, या वाढत्या तणावाच्या काळात चीन आणि इराणशी संबंधित जहाजांना वगळता इतर कोणत्याही जहाजांना या मार्गातून प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नाही. परिणामी, सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक क्षमतेच्या तुलनेत अत्यंत कमी झाली आहे. या अडथळ्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर होत असून, तेलपुरवठ्यातील अनिश्चितता वाढताना दिसत आहे. (Iran toll tax on Strait of Hormuz)


Powered By Sangraha 9.0