Ashok Kharat Office Sealed: भोंदू खरातचं ऑफिस सील! बँक खातेही...

26 Mar 2026 15:36:11
 
Ashok Kharat Office Sealed
 
मुंबई : (Ashok Kharat Office Sealed) अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) कडून वेगाने सुरू असून नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Ashok Kharat Office Sealed)
 
तपासाचा भाग म्हणून एसआयटीच्या पथकाने गुरूवार दि. २६ मार्च रोजी आरोपीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. या ठिकाणी अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप असून, त्याच जागेची सखोल तपासणी करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय सील करण्यात आले आहे. दरम्यान, अशोक खरात याच्या ‘शिवानिका’ संस्थेशी संबंधित बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Ashok Kharat Office Sealed)
 
हेही वाचा: Ashok Kharat Farmhouse Scam: “तुर्कस्थानहून २.५ कोटींचा..., नाही तर तुझा मृत्यू...!” भोंदू खरातच्या फार्महाऊसचा थरारक खुलासा... 
 
एसआयटीने आरोपीच्या मालमत्तेचा तपशील मागवला असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांचीही चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल उघड होण्याची शक्यता असून, ही संपत्ती नेमकी कुठून आली याचा तपास केला जाणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ashok Kharat Office Sealed)
 
 
Powered By Sangraha 9.0