Ashok Kharat Farmhouse Scam: “तुर्कस्थानहून २.५ कोटींचा..., नाही तर तुझा मृत्यू...!” भोंदू खरातच्या फार्महाऊसचा थरारक खुलासा...

26 Mar 2026 15:30:41
Ashok Kharat Farmhouse Scam 
 
मुंबई : (Ashok Kharat Farmhouse Scam) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारलेल्या आलिशान फार्महाऊससाठी थेट तुर्कस्थानातून फर्निचर मागवून, एका व्यावसायिकाकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी केलेल्या फिर्यादीनुसार, लॉजिस्टिक व्यवसाय परदेशात सुरू करण्यासाठी आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांचा अशोक खरात याच्याशी संपर्क आला. मात्र, हा संपर्क त्यांना मोठ्या आर्थिक फसवणुकीत ओढणारा ठरला. (Ashok Kharat Farmhouse Scam)
 
जून २०२२ मध्ये नाशिक जिल्ह्यातील ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावून खरातने ‘उत्तरपुजा’ करण्यासाठी त्याच्या नव्या वास्तूमध्ये तुर्कस्थानातून फर्निचर बसवणे आवश्यक असल्याचे सांगितले. “हे फर्निचर नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल,” असा दावा करत, तसे न केल्यास मृत्यू होईल, अशी भीती बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना दाखवण्यात आली. (Ashok Kharat Farmhouse Scam)
 
राजेंद्र जासूद यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या मागील बाजूस रिंगण आखून त्यांना त्यात उभं करून बाहेर पडल्यास जळून भस्म होशील अशी धमकी देत दबाव आणण्यात आला. जीवाच्या भीतीने त्यांनी भोंडू खरातच्या फार्मफाऊसाठी ओळखीच्या एजंटमार्फत तुर्कस्थानातून तब्बल ९० लाख रुपयांचे फर्निचर खरेदी करून दिले. याशिवाय, पुण्यातील टिंबर मार्केटमधून सागवानी लाकूड खरेदी करण्यासाठी २९ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. एकूण फार्महाऊस बांधकाम, इंटेरिअर आणि फर्निचरसाठी सुमारे २.५ कोटी रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Ashok Kharat Farmhouse Scam)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे या आलिशान फार्महाऊसमधील केवळ किचनसाठीच सुमारे ४२.५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सजावटीच्या वस्तू देखील फिर्यादीकडूनच खरेदी करून घेतल्याचा आरोप आहे. तसेच, २०१९ ते २०२२ या काळात ‘उत्तरपुजा’च्या नावाखाली फार्महाऊस उभारणीसाठीच तब्बल १ कोटी ११ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले आहे. (Ashok Kharat Farmhouse Scam)
 
दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील वाढत्या आरोपांमुळे तपास अधिक गतीने सुरू असून, आणखी मोठे आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat Farmhouse Scam)
 
 
Powered By Sangraha 9.0