मुंबई : (Andhra Pradesh Bus Accident) आंध्र प्रदेशातील मर्कापुरम (Markapuram) जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका खासगी बसला लागलेल्या आगीत किमान १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.(Andhra Pradesh Bus Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील जगतिअल (Jagtial) येथून नेल्लोर जिल्ह्यातील विंजामुरूकडे जाणाऱ्या हरीकृष्ण ट्रॅव्हल्सची एका ट्रकला धडक बसली. त्यानंतर बसने पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये किमान ४० प्रवासी होते. हा अपघात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. सुमारे तीन तासांत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
(Andhra Pradesh Bus Accident)
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरुन यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे आणि घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.(Andhra Pradesh Bus Accident)