मुंबई : (Iran stops Pakistan's cargo ship at Strait of Hormuz) अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला २५ दिवस पूर्ण झाले आहेत. याचदरम्यान, या संघर्षामध्ये पाकिस्तान हा दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अशातच शांतता प्रस्थापित करण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला इराणने मोठा झटका दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी जहाजाला इराणी सैन्याने रोखल्याची घटना समोर आली आहे.(Iran stops Pakistan's cargo ship at Strait of Hormuz)
IRGC कमांडरने पोस्ट करत दिली माहिती
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा बंदरातून पाकिस्तानच्या कराची येथे जात असलेल्या 'सेलेन' नावाच्या जहाजाला होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखले. वाहतुकीच्या परवानगीअभावी जहाजाला होर्मुझच्या प्रवेशद्वारावरुन माघारी फिरावे लागले. आयआरजीसीचे नौदल कमांडर अलिरेझा तंगसिरी यांनी ‘सेलेन नावाच्या या जहाजाकडे होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी नव्हती. या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला आधी इराणी अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल’, असे स्पष्टपणे सांगितले. अलिरेझा तंगसिरी यांनी याबाबत एक्सवरुन माहिती दिली आहे. सामुद्रधुनी पार करण्यासाठी संपूर्ण सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.(Iran stops Pakistan's cargo ship at Strait of Hormuz)
संघर्षापासून होर्मुझचा जलमार्ग बंद
अमेरिक - इस्रायलविरुद्ध सुरु असलेला इराणचा संघर्ष आता चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. संघर्षानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे जलमार्गाद्वारे होणारी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पर्शियन आखाताला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा जलमार्ग मानला जातो. पण, संघर्ष सुरु झाल्यानंतर इराणने सामुद्रधुनी बंद केल्याने जगाच्या गॅस आणि इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
(Iran stops Pakistan's cargo ship at Strait of Hormuz)