
(Image - Gemini)
मुंबई : (Railway New Rules) भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी २४ एप्रिल रोजी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील पहिला निर्णय हा रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्यासंदर्भातील आहे; तर दुसरा निर्णय गाडी सुटण्याच्या काही मिनिटे आधी प्रवाशांना बोर्डिंग पॉईंट म्हणजेच स्टेशन बदलण्याची मुभा देणारा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण नियमांबाबतची माहिती दिली आहे.(Railway New Rules)
तिकीट रद्द करण्याचे नवे नियम काय आहेत?
१) कन्फर्म तिकीट प्रवासाच्या ७२ तासांआधी रद्द केल्यास तुम्हाला शक्य असलेली जास्तीत जास्त रक्कम परत मिळणार.
२) ट्रेन सुटण्याच्या ७२ ते २४ तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांच्या आत तिकिट रद्द केल्यास मानक दंड आकारला जाईल. किमान शुल्काच्या २५ टक्के रक्कम कापली जाणार.
३) ट्रेन सुटण्याच्या २४ ते ८ तास आधी तिकिट रद्द केल्यास तिकिट दराच्या केवळ ५० टक्के रक्कम प्रवाशांना मिळणार.
४) ट्रेन सुटण्याच्या आठ तासांआधी तिकिट रद्द केले तर प्रवशांना कोणताही परतावा मिळणार नाही.
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा
प्रवाशांना आता बोर्डिंगमध्ये थोडी अधिक लवचिकता मिळाली आहे. तुम्ही ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपर्यंत तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.(Railway New Rules)
इतर मोठे बदल:
- आता कोणत्याही रेल्वे स्थानकावरून काउंटर तिकीट रद्द करता येणार.
- ई-तिकिटांसाठी 'तिकीट डिपॉझिट रिसीट' (TDR) प्रक्रिया रद्द करण्यात आली असून परताव्याची प्रक्रिया आपोआप पूर्ण होणार.
- गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत क्लास अपग्रेडची करण्याची सुविधा.
या सुधारणा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे नियम १ ते १५ एप्रिलदरम्यान टप्प्याटप्याने लागू करण्यात येणार आहेत.
(Railway New Rules)